
विज प्रवाहाच्या झटक्याने लाईनमन जागीच ठार ..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 04/02/2024.
गडचिरोली :-
विज प्रवाहाच्या झटक्याने लाईनमन जागीच ठार ..
विज ग्राहकाची तक्रार असल्याने इंदिरा गांधी चौक गडचिरोली जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या पोलवर चढुन काम करताना अचानक. विजेचा धक्का बसला व तो लाईनमन खाली पडल्याने. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच जिव गेला. आज दि.4/02/2024.ला दुपारी 11. वाजताच्या सुमारास घडली .लाईनमन जितेंद्र गजलवार वय 45 वर्ष असुन आरमोरी रोड गडचिरोली येथील राहणारा आहे.
खाबावरील विज पुरवठा सुरळित करण्याकरीता विद्युत प्रवाह बंद करुनच विजेच्या खांबांवर चढला होता .परंतु अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने सदर लाईनमनला जोराचा झटका बसल्याने विद्युत शाक लागुन लाईनमनचा जागीच मृत्यू झाला.
गडचिरोली पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटणास्थळी येउन पंचनामा करुन शवविच्छेदनासाठि सामान्य रुग्णालयात गडचिरोली येथे पाठविण्यात आले.अधिक तपास सुरू असुन विज वितरण कंपनिचा चुकीने हा अपघात झाला आहे असे बोलल्या जात असुन सदर प्रकरणाची चौकशी करून यात बेजबाबदार असणारे अधिकारी यांच्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. व मृत्यकांच्या कुटुंबियांना आथिँक मद्दत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.