अड्याळ ग्रामपंचायत येथे सर्वांची योजना ,सर्वांचा विकास या मोहिमेअंतर्गत ग्रामसभा दुमदुमली ।
गडचिरोली / चामोर्शी
दिनांक 2/10/2024.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज मुख्य संपादक संतोष मेश्राम .
अड्याळ ;– चामोर्शी तालुक्यातील अड्याळ ग्रामपंचायत येथे आज दि.2 आँक्टोबर रोजी सर्वांची योजना सर्वांचा विकास या मोहिमेतंर्गत कार्यक्रम राबविण्यात आला.त्यावेळी मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष कु.स्वातीताई टेकाम सरपंच ग्रा.प.अड्याळ ,उपसरपंच विजय मेश्राम ,मा.निकेशभाऊ गद्देवार ग्रा.प.सदस्य अड्याळ ,श्रि .ऐलावार सचिव ग्रा.प .अड्याळ ,शानू मडावी ग्रा.प.सदस्य ,प्रशांत चन्नावार ,आशा शिडाम ग्रा.प.सदस्य ,तसेच पिरामल फाँऊडेशन अतंर्गत कु.आंशिका बडोलीया मँडम, कु.आकृती खरे मँडम ,गांधी फेलो अंतर्गत विशेष ग्रामसभा शाखा व पिरामल फाँऊडेशन गडचिरोली ,कु.स्मिता येलमुले मँडम (करुणा फेलो ),सौ. सरिका नैताम मँडम , श्रि. ,मंगलदास चापले त.मु.स.अध्यक्ष ग्रा.प.अड्याळ ,सामाजिक कार्यकर्ते श्रि. हरीदास टेकाम ,प्रमोद उमरे रोजगार सेवक ,तसेच अड्याळ ग्रामपंचायतर्गत येत असलेल्या सर्व जि.प.प्राथमिक शाळाचा व शिक्षक ,विद्यार्थी, गावांचा ,व 75 वर्षावरील सर्व पुरुष व महिलांचा सहभाग होता.त्यांना शाल व त्रिफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच वृक्षारोपन करण्यात आले, किशोरवयीन मुलींना प्याडचे वितरण करण्यात आले, तर सहभागी शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण केले .व त्यांना नोटबुक ,पेन वितरण करण्यात आले. आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली त्यात बि.पि शुगर टेस्ट ,व ब्लडग्रुप तपासणी करण्यात आली.
तसेच गावात स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपन करण्यात आले तसेच मंचावर वरील सर्व मान्यवराचे स्वागत करुन कार्यक्रमाची सूरूवात करण्यात आली.
मार्गदर्शन करतांना श्रि.मा.निकेश भाऊ गद्देवार ग्रा.प.सदस्य अड्याळ .
चांगले मुले शिकले तर उद्याचे ,उद्योग क्रांतिचा जनक आहे । निकेश गद्देवार याचे प्रतिपादन …
मुलांना स्वच्छता कशी राखायला पाहिजे आणि स्वच्छतेचा धडा हाती घेतला पाहिजे व स्वच्छता परीसर ,व आपली निगा राखली पाहिजे व 75 वर्ष पूर्ण झालेल्या दिडशे दोनशे महिला व पुरुष आज उपस्थित आहेत हे आमचे सौभाग्य परंतु आताच्या काळात आम्ही 75 वर्ष जगणार यांची काहि शाश्वती वाटत नसल्याचे सांगितले आणि त्यामुळे आताची पिढी व्यसनाधीन होत आहे व त्यामुळे आपण आपले आयुष्य कमी करत आहोत आणि त्यामुळे आपण वाईट सवयी व व्यसनांना बळी न पडता आपल्या घरातील वातावरण एक चांगले निर्माण करावे आणि याची जबाबदारी आई वडिल घेतले पाहिजे ,आणि आपल्या मुलांना डॉ. ,वकील , इंजिनियर, क्लास वन च्या चांगल्या स्तरावर न्हाव तसेच व्यसनापासून दुर राहुन आरोग्याची काळजी घेतली तर आपण सुद्धा 75 वर्ष जगु आणि स्वच्छतेची कास धरु .आपण आपला विकास करु .असे झाले तर आपले मुले नक्कीच चांगले शिकले तर ,उद्याचे उद्योग क्रांतिचे जनक राहणार असे प्रतिपादन निकेश गद्देवार यांनी केले. तसेच त्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिला पुरुष


व किशोरवयीन मुली मुले व परीसरातील सर्व जनता कार्यक्रमाला उपस्थित होते.

त्यामुळे अड्याळ ग्रामसभा जल्लोषात दुमदुमली …

तसेच कु.स्वाती टेकाम मँडम सरपंच ग्रा.प. अड्याळ यांनी सुद्धा मार्गदर्शन केले,
कु.स्वाती टेकाम मँडम सरपंच ग्रा.प. अड्याळ यांनी मार्गदर्शन करतांना ।
मार्गदर्शन करतांना कु.अंशिका बडोलीया मँडम (गांधी फेलो )
मार्गदर्शन करतांना कु.आकृती खरे मँडम । (गांधी फेलो )
कु.अंशिका बडोलीया मँडम , यानी सुद्धा कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले., आकृती खरे मँडम ,कु. स्मिता येलमुले मँडम, सरीता नैताम मँडम ,तसेच मंचावरील पाहुणे उपस्थित सर्व जि.प.प्राथ.शिक्षक, मा.संतोष मेश्राम पत्रकार यांचे व ग्रा.प.चे सर्व कर्मचारी, यां सर्व उपस्थिताचे सर्वांचे मनपुर्वक आभार मानले. आभार प्रदर्शन श्री. ऐलावार ग्रा.सेवक ग्रा.प.अड्याळ यांनी केले.
आभार प्रदर्शन करतांना श्री.ऐलावार सचिव ग्रा.प.अड्याळ