
धान कापणी करणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला ; महिला जागीच ठार !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
मुख्य उपसंपादक
स्वप्नील मेश्राम
आरमोरी :- ( रामाळा )
आरमोरी तालुक्यात वाघाच्या हल्यात महिला ठार झाल्याची घटना आज दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात दहशद व भितीचे वातावरण पसरले आहे. ताराबाई एकनाथ धोडरे (६०) रा. काळागोटा (आरमोरी) असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव असुन मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी परिसरात धान कापणीचे काम सुरू आहे अशातच वाघाची दहशत व दुमदुमी असुन सुध्दा शेतकरी काम करीत आहेत.
आरमोरी पासुन ५ किमी अंतरावर असलेल्या रामाडा गावातील शेतशीवारात काडागोटा येथील ७ ते ८ महीला धान कापणीचे काम करीत असताना अचानक दडून बसलेल्या वाघाने ताराबाई धोडरे या महिलेवर हल्ला करून काही दूर फरकडत नेवुन नरडीचा घोट घेतला. व सोबतीचा महिलांनी आरडाओरड केल्याने वाघ तिथून पळून गेला मात्र यात ताराबाई यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाहण्यासाठी घटनास्थळी परिसरातील नागरिकांची गर्दी उसळली.तसेच घटनेची माहिती दिल्याने वणकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी उपस्थीत नागरिकांनी वनविभागाप्रती तीव्र रोष व्यक्त केला व काही मागण्या धरून रेटल्या व वनमजूर २० ते २५ गस्त घालत ठेवण्यात यावे अशी मागणी केली.
सदर क्षेत्रात कार्यरत असलेले वनरक्षक व वणपाल यांची चौकशी करुन त्यांचेवर कारवाही करण्यात यावी व मृत्यु झालेल्या महिलेच्या कुटुंबीयास आर्थिक मदत करावी अशा मागण्या गावातील नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडे केल्या असता मागणी पुर्ण करण्याचे आश्वासन वनपरिक्षेत्र अविनाश मेश्राम यांनी दिले. त्यानंतर मृत्य देह उत्तरिय तपासणीकरीता रुग्णालयात पाठविण्यात आले.