राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते गोंडवाना विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत समारंभ संपन्न …
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते गोंडवाना विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत समारंभ संपन्न …
गडचिरोली :-
गोंडवाना विद्यापीठ चा 10 वा दीक्षांत समारंभ व अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीचा कोनशिला समारंभ आज भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पार पडला.
रमेश बैस, मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य तथा मा. कुलपती, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली हे अध्यक्षस्थान भूषविले .या समारंभात विशेष अतिथी म्हणुन नितीन गडकरी मा. मंत्री रस्ते वाहतुक व महामार्ग भारत सरकार, हंसराज अहिर मा.राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष , देवेंद्र फडणवीस ,मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, चंद्रकांतदादा पाटील मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, श्री. सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री, वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय, डॉ. विजय गावित , मंत्री आदिवासी विभाग ,गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. प्रशांत बोकारे व प्र- कुलगुरु श्रीराम कावळे , कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांची विशेष उपस्थिती होती.
या सोहळ्यात गोहणे अमित रामरातन, ठोंबरे अर्पिता पुरुषोत्तम, हलमी लोकेश श्रीराम, अन्सारी सदाफ नफीस अहमद, शिंदे संतोष प्रकाश, सारिका बाबुराव मंथनवार या विद्यार्थ्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुवर्ण पदक तसेच पदवी प्रदान करण्यात आली.