नगरीं येथील संडास बांधकामाच्या चौकशीची मागणी.
कार्यकारी संपादक:- अनुप मेश्राम

नगरीं येथील संडास बांधकामाच्या चौकशीची मागणी.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
कार्यकारी संपादक अनुप मेश्राम
दि.26.2023.
डगडचिरोली ,
नगरीं येथील संडास बांधकामाच्या चौकशीची मागणी
गडचिरोली पंचायत सfमिती अंतर्गत येत असलेल्या, नगरी ग्रामपंचायत अंतर्गत सन 2021 ते सन 2022 या कालावधी मध्ये भारत मिशन स्वछता योजने अंतर्गत तीन लाख रुपये खर्च करून,अगदी रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या संडासाचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून.सदर बांधलेलेल्या संडासाचे बांधकाम भुईसपाट होण्याच्या मार्गावरती आहे.
गावरस्त्याच्या कडेला बांधेलेले संडास हे झाडाझुडपाणे वेढलेले असून, संडासात लावलेले दरवाजे सुद्धा मोडकडीस आलेले आहेत.संडासात लावलेले नळाचे पाईप सुद्धा तुटलेले व फुटलेले असून, संडासाच्या सिटा घाणीने बरबटलेले आहेत.
बेवारीस स्थितीत पडलेल्या संडासामध्ये गावाकऱ्यांनी दोन वर्षात संडासाचे तोंड सुद्धा बघितलेले नसल्याचे गावाकऱ्यांकडून सांगितले जातं आहे.
तीनलाख रुपये खर्चनं बांधलेल्या संडासाच्या चोकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते चोखाजी ढवढे यांनी केलेली असून ठेकेदार. व ग्रामसेवक यांच्या कडून खर्च करण्यात आलेली सम्पूर्ण रक्कम वसूल करण्याची मागणी चोखाजी ढवढे यांनी केली आहे.