मुख्याधिका-यांच्या कॅबिनला वंचित च्या नेतृत्वात झोपडपट्टीधारकांनी घातले चपलाचे हार…
मुख्य संपादक

मुख्याधिका-यांच्या कॅबिनला वंचितच्या नेतृत्वात झोपडपट्टीधारकांनी घातले चपलाचे हार…..
गडचिरोली,
गेल्या महिणाभरापासून रहिवासी दाखले मिळण्यासाठी नगर परिषद गडचिरोली कार्यालयाच्या चकरा मारूनही दाखले न मिळाल्याने अखेर वंचितच्या कार्यकर्त्यांनी व झोपडपट्टी धारकांनी मुख्याधिका-यांया कॅबिनला चपलाचा हार घालून रोष व्यक्त करण्यात आले.
एकता नगर येथिल झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे बांधून देण्याचे पत्र मुख्याधिकारी पिदुरकर यांनी दिले होते परंतु अर्ज देऊनही एक महिणा झाला तरी रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याने संतप्त झालेल्या वंचितच्या पदाधिकारी व झोपडपट्टीधारकांनी नगर परिषद गाठत मुख्याधिका-यांच्या कॅबिनला चपलाचे हार धालून मुख्याका-यांचा निषेध केले.
बाळू टेंभुर्णे, जी के बारसिंगे, बाशिद शेख, मालाताई भजगवळी, दिलीप बांबोळे, शोभा शेरकी, शकुंतला दुधे, वासुदेव मडावी , कवडू दुधे, सोनम साळवे, सोनम कुलसंगे, वदना येळमे, आदि सहीत शेकडो झोपडपट्टीधारक उपस्थित होते.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करून जो पर्यंत रहिवासी प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतली.