धानोरा वैद्यकीय अधीक्षकांचे डॉक्टरांनवर नियंत्रणच नाही! नर्स,कंपाउंडर असून काही कामाचीच नाहीत.!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

धानोरा वैद्यकीय अधीक्षकांचे डॉक्टरांनवर नियंत्रणच नाही! नर्स,कंपाउंडर असून काही कामाचीच नाहीत.!
गडचिरोली..
अनुप मेश्राम
कार्यकारी संपादक
गडचिरोली :- धानोरा
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालया अंतर्गत येत असलेले आणी धानोरा उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टरआर.एन.
गजभे यांचे वैद्यकीयअधिकारी व कार्यरत कर्मचाऱ्यांवर मुळीच नियंत्रण नसल्यामुळे कर्मचाऱ्याच्या हेकेखोर वृत्तीमुळे धानोरा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांचे अतिशय हाल होत असून परिसरातील अनेक रुग्णाना आरोग्य सेवेपासुन मुकावे लागत असल्याचे रुग्णाकडून व रुग्णाच्या नातेवाहिकाकडून सांगितले जात आहे.
. यां गंम्भीर बाबीला वैद्यकीय अधीक्षक आर. एन. गजबे हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.
धानोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या सुरज गुंडम वार या तरुणावर नुकताच एक प्रसंग ओढवल्याचे त्यांच्याकडून सांगितले जातआहे.
सुरज गुंडमवार यांना त्यांच्या गाडीचा स्टॅन्ड त्यांच्या पायाच्या अंगठ्याच्या नखाला लागून नख पूर्णपणे बाहेर निघून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू असताना, गुंडमवार हें दिनांक 31.07.2023 ला अंदाजे दुपारी तीन ते साडे तीनच्या सुमारास उपचारासाठी धानोरा रुग्णालयात गेले असता. त्यांची वैद्यकीय तपासणी तर सोडा, उलट कार्यरत नर्स,व कम्पपाऊडर यांनी एकमेकांकडे बोटे दाखवून उपचारासाठी आलेल्या सुरज गुंम वार यांची जणू एकप्रकारची थट्टा करण्याचीच कामे कार्यरत कर्मचाऱ्यांनी सुरु केली. वेदनानी त्रस्त झालेल्या गुंडमवार यांनी वैधकीय अधीक्षक धानोरा यांची भेट घेऊन त्यांना उपचारासाठी विचारणा, प्रसंगी विनंती केली असता अधीक्षकांनी उडवाऊंडवीचे उत्तरे देऊन स्वताच्या मोबाईल मध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले.
वैद्यकीय अधीक्षक यांच्या बेजबाबदार व निष्क्रियतेप णामुळे. धानोरा उपजिल्हा रुग्णालय वाऱ्यावर असल्याचे दिसून आले.अश्या निष्क्रिय, बेजाबदार,वैधकीय अधीक्षक यांची त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी रुग्णांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी तसेच अन्याय ग्रस्त गुंडमवार यांनी सुद्धा केलेली आहे.