
पत्रकार अनुप मेश्राम यांच्या घरावर. रोहित बारसिंगे या गावागुंडाचा हल्ला.!
गडचिरोली. दि. 15मार्च 2024.
विचारक्रांती. न्युज.चे संपादक.तथा ” दणका कायद्याचा” डिजिटल न्युज चे कार्यकारी संपादक
अनुप मेश्राम.
गडचिरोली
आज दिनांक.15 03.2024 ला संध्याकाळी 6 वाजेपासून तर रात्रौ 10 ते 10.30 वाजेच्या दरम्यान,माझे घराशेजारी रोहित बरसिंगे यांच्या मुलांचे नामकरण विधीच कार्यक्रम सुरू असताना, स्पीकरचा आवाज कमी करा. माझ्या ताईला, आवाज सहन होत नाही. ती शुगर. व बी. पी. ची पेशन्ट आहे.अशी विचारणा केली असता.
रोहित लोमेश्वर बारशिंगे या गावगुंडाने. तुम्ही माझा स्पीकर चा आवाज कमी करायला सांगणारे कोण.? कार्यक्रम माझा आहे. कार्यक्रमातील स्पीकर बंदतर करून दाखवा.मी तुला पाहून घेईन. अशी धमकी देऊन रोहित बारसिंगे या गावगुंडानी माझे एकटेपणाचा फायदा घेऊन जोर जबरदस्तीने माझ्या घरात घुसून, रात्रौ माझ्या घरावर त्यांनी तीनदा हल्ला सुधा केला. वार्डतील व आजूबाजूच्या परिसरातील शांतता सुधा भंग केलेली आहे. तसेच माझ्या घराच्या दरवाजाला जोरजोरात लाठी व लाथा बुक्यांनी मारून घरातील दरवाजा सुधा तोडण्याचा प्रयत्न केला.तसेच अश्लील शब्दात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे.
रोहित बारशिंग या गावगुडास त्वरित अटक करून, त्यांचेवर पत्रकार संरक्षण कायद्यां अंतर्गत कारवाई करण्याची मागणी अनुप मेश्राम यांनी केली आहे.
तसेच रात्रौ 10 ते10.30 च्या दरम्यान गडचिरोली पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष जाऊन एक लेखी तक्रार सुद्धा दिलेली आहे.
रात्रौ गडचिरोली ठाणेदार यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क केला असता. ठाणेदार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.रोहित बरसिंगे या गावगुंडावर कोणती कारवाही करतात हे उद्यालाच कळेल.