देश-विदेश
एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन, युरोपियन संसद सदस्यांनी ठेवला प्रस्ताव l
मुख्य संपादक

एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन, युरोपियन संसद सदस्यांनी ठेवला प्रस्ताव l
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज
दिनांक 30 .1 .2025.
युरोप,
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्स व एक्स सारख्या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.
स्लोव्हेनियाचे युरोपियन संसद सदस्य (MEP) ब्रँको ग्रिम्स यांनी अधिकृतपणे एलॉन मस्क यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ब्रँको ग्रिम्स यांच्या म्हणण्यानुसार, एलॉन मस्क यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी समर्थन दिले आहे. तसेच, जागतिक शांतता राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे एलॉन मस्क यांना या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.