होळी व रंगपंचमीच्या पूर्व संधेला लाल रंग ठरला जीवनदान…
ता.प्रतिनिधी आकाश बंडावार

होळी व रंगपंचमीच्या पूर्व संधेला लाल रंग ठरला जीवनदान…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांच्या तत्परतेने एका वृध्द महिलेला वेळेवर मिळाले एक पिशवी रक्त ..
गडचिरोली ,
दिनांक 24 मार्च 2024.
तालुका प्रतिनिधी आकाश बंडावार .
एका 75 वर्षे असलेल्या वृध्द महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे एकआठवड्या अगोदर भरती करण्यात आले होते. शरीरात अल्प प्रमानात रक्त असल्यानं त्यांना तात्काळ रक्ताची आवश्यकता असल्याची माहिती दिनांक 24 मार्च 2024 रोज रविवार ला आयुष दुधे यांनी जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांना दिली. लगेच जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार व ग्राम रक्तदुत प्रशांत गावडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून त्या वृद्ध महिलेची भेट घेवून प्रकृतीची विचारपूस केली असता त्यांच्या शरीरात 6 ग्राम रक्त असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा रक्तदुत व ग्राम रक्तदुत यांनी जिल्हा रक्त संकलन केंद्र गडचिरोली येथील डॉ. अंजली साखरे यांची भेट घेवून सदर वृद्ध महिलेला वेळेवर एक बाटल रक्त उपलब्ध करून देण्याची मोलाची भूमिका संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पार पाडली.
चंद्रपूर जिल्यातील सावली तालुक्यातील सामदा सोनापुर येथील सुलोचना बांबोळे वय 75 वर्षे या वृध्द महिलेला आजारांमुळे आणि वयोवृद्धामुळे रक्ताची कमतरता असल्याने अडचण निर्माण झाली होती त्यांना ए पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यक असल्याने डॉक्टरानी सांगितले त्यानुसार आयुष दुधे यांनी जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांच्याशी संपर्क करून मदत करण्याची विनंती केली. जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार व ग्राम रक्तदुत प्रशांत गावडे यांच्या तत्परतेने सदर वृद्ध महिलेला वेळेवर एक बाटल रक्त उपलब्ध करून दिल्याबद्दल नातेवाईकांनी जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येनापुर द्वारा संचालित रक्तदाता शोधमोहिम व जनजागृति अभियान जिल्हा गडचिरोली येथील जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार व ग्राम रक्तदुत प्रशांत गावडे यांचे विशेष आभार मानले…
शरीरातील लोहचे प्रमाण कमी होऊ नये याकरिता प्रत्येकानी सकस आहार घ्यायला पाहिजे तसेच डॉक्टरचा सल्ला घेवून नियमित हिमोग्लोबिनची तपासणी करीत राहावे, असे जिल्हा रक्तदुत्त यांनी म्हटले आहे.