
लग्नाआधीच सासूसोबत पडला नवरदेव ! नवरी हॉस्पिटलमध्ये तर सासरा पोलीस स्टेशनमध्ये !
उत्तर प्रदेश, अलीगड ।
दिनांक 10/4/2025.
उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये आईनेच मुलीचा विश्वासघात केला आहे. मुलीचे लग्न ठरलेल्या मुलाबरोबर मुलीची आईच पळून गेली आहे. गेली ती गेली आणि वर घरातील सर्व दागिने आणि लग्नासाठी जमविलेले पैसेही घेऊन पळाली आहे. येत्या १६ एप्रिलला मुलीचे लग्न होते. त्यापूर्वीच मुलगी आजारी पडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तर नवरदेवाचा सासरा आता दोघांना पकडण्यासाठी पोलिस ठाण्याच्या चकरा मारत आहे.