
फुले वार्डात पडू लागला पाण्याचा भीषण दुष्काळ !
कार्यकारी संपादक अनुप मेश्राम
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली , दि२२.फेब्रु 2025
गडचिरोली शहरातील फुले वार्ड क्रमांक २ मध्ये पाण्याचा भीषण दुष्काळाची चाहूल फेब्रुवारी महिन्यापासूनच लोकांना जाणवू लागलेली आहे. ज्याच्याकडे पाण्याची साधने नाही ज्यांचे नळ बंद अवस्थेत पडलेले आहेत अशा लोकांनवर पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ त्याच्यावर आलेली आहे.
वार्डामध्ये ज्यांच्याकडे पाण्याची साधने भरपूर आहेत.अनेक मार्गांनी पाण्याचा उपसा करतांना दिसत आहेत. मटका भर पाण्यासाठी त्यांच्यापुढे हात पसरण्याची. त्यांची मनमर्जी संपादन करण्याची वेळ दुष्काळ ग्रस्त नागरिकांवर येताना दिसत आहे.
नगरपरिषद प्रशासनाने फुले वार्डातील नागरिकात सतत जाणवणारी पाणी समस्या दूर करण्यासाठी फुले वार्डामध्ये स्वतंत्र पाण्याची टाकी बांधून वार्डातील लोकांची पाणी समस्या दूर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम यांनी केली आहे.