कृषीवार्तादिल्ली
करोडो शेतकऱ्यांना केद्राकडुन नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट हवामान आधारीत पीक विमा योजनेला 2025 -26 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी …
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

करोडो शेतकऱ्यांना केद्राकडुन नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट ; हवामान आधारीत पीक विमा योजनेला 2025 -26 पर्यंत, सुरु ठेवण्यास परवानगी …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 2/01/2025
दिल्ली
एकीकडे शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दिल्ली बॉर्डरवर आंदोलन सुरु केलेले असताना दुसरीकडे केंद्राने नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोठे गिफ्ट जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारीत पीक विमा योजनेला २०२५-२६ पर्यंत सुरु ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी ६९५१५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला आहे.
#agriculture