
अवैध वाळू तस्करी करणाऱ्या चार ट्रकवर ,कोठारी ठाणेदाराची कडक कारवाई…
चंद्रपूर
कोठारी
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध व्यवसाय जोर धरला.दरम्यान याची कुनुक कोठरीचे ठाणेदार आशिष बोरकर यांना लागली.कार्यक्षेत्रात त्यांनी नियंत्रण मिळविले.विशेष करून रेती व जनावरे तस्करी करणाऱ्यावर ठाणेदारांची करडी नजर होती.अशावेळी नुकतेच त्यांनी तोहोगावातील रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या.रेतीच्या चार टॅक्टर पकडुन त्यांच्यावर कायद्याची चाबूक हाणली.
कोठारी पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी रेतीने भरलेले चार ट्रॅक्टर जप्त केले.त्याची किंमत चोवीस लक्ष चाळीस हजार रुपये आहे.सद्या प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई योजना,शबरी योजना,यशवंतराव चव्हाण योजनेतर्गत ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी रेतीची आवश्यकता आहे.अशावेळी पुन्हा घरकुल मंजूर झाले.त्याचवेळी परिसरात अनेक विकासकामे सुरू आहेत.दरम्यान रेतीची गरज असताना याचा मोठा फायदा रेती तस्कर घेवू लागले आहेत.सद्या रेती घाटाचे लिलाव न झाल्याने अवैध रेतीतस्करी थांबविण्यासाठी कोठारी पोलिसंचे पथक कार्यान्वित आहे.त्यांच्यावर ठाणेदार आशिष बोरकर यांचे नियंत्रण असून महसूल विभागाकडून देखील युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.अशावेळी बोरकर यांनी रेती तस्करावर कार्यवाहीचा बडगा उभारल्याने रेती बंद झाली असताना रेतीअभावी घरकुलधारक आपले घरकुल पूर्ण करेल का ? हा प्रश्न भेडसावत आहे.दरम्यान शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात रेतिघटाचे लिलाव न केल्याने रेती मिळणे कठीण झाले आहे.सर्वत्र कारवाईचा धडाका सुरू आहे.अशातच भाव वाढला.दरम्यान कोठारी पोलिस स्टेशनला दोन महिन्यापूर्वी रुजू झालेले ठाणेदार आशिष बोरकर यांनी रेती तस्करावर चागलीच चाप बसविली आहे.त्यामुळे परिसरातील तस्करांचे धाबे दणाणले आहेत.