राजकिय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठे यश; गुजरात मध्ये 215 जागांवर बिनविरोध विजय ..
मुख्य संपादक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठे यश; गुजरात मध्ये 215 जागांवर बिनविरोध विजय ..
दि.6/2/2025.
गुजरात ,
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठे यश मिळाले आहे. राज्यत एकूण 215 जागांवर भाजपला बिनविरोध विजय मिळा आहे. याच बरोबर भाजपने हलोल, भचाऊ, जाफराबाद आणि बाटवा या चार नगरपालिकांमध्येही बिनविरोध विजयाचा दावा केला आहे. या जागांवर 16 फेब्रुवारीला मतदान होणर होते. मात्र, विरोधकांनी मैदान सोडल्याने भाजप आधीच विजयी झाला आहे.
भाजपने दिेलेल्या माहितीनुसार, पक्षाने हलोलमधील ३६ पैकी १९ जागा, भचौमधील २८ पैकी २२, जाफराबादमधील २८ पैकी १६, तर बांटवामधील २४ पैकी १५ जागा न लढवताच जिंकल्या आहेत. याशिवाय, इतरही काही जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.