कोटगल ग्रामपंचायतीने गाव स्वच्छतेकडे केले दुर्लक्ष.! घरापुढे कचऱ्यांचे ढिगारे!
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

कोटगल ग्रामपंचायतीने गाव स्वच्छतेकडे केले दुर्लक्ष.! घरापुढे कचऱ्यांचे ढिगारे!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
कार्यकारी संपादक.
अनूप मेश्राम.
गडचिरोली.( दि २२/८/२४.)
कोटगल ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाने गाव स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावांतील येण्या जाण्याचा मार्गावर व नवकेतन मेश्राम यांच्या वास्तव्य करीत असलेल्या घरापुढे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन आजूबाजूला दुर्गंधी.सुटताना दिसत आहे .
ग्रामसेवक, आणि सरपंच या दोन जबाबदार व्यक्तींना रस्त्यावरील व घरापुढील कचरा हटविण्याचा जणू विसरच पडलेला असून,नाली बांधकाम, शाळा दुरस्ती.स्टेज बांधकाम, व शाळेची रंगरंगोटी या सारखे अनेक उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविणे सुरू केलेले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असताना व गावात जीव घेणाऱ्या रोगाची साथ पसरण्याची शक्यता असताना सुध्दा.ग्रामसेवकास लोकांच्या जिविताशी काही देणेघेणे उरलेलेच नाही.
गावातील जबाबदार सरपंच. व ग्रामसेवक यांना घरापुढे पसरलेल्या घाणी बाबत अनेकदा तोंडी विचारणा केली असतानं सुध्दा ग्रामसेवक व सरपंच यां दोघानी गंभीर बाबीकडे हेतु पुरस्पर दुर्लक्ष , व डोळेझाक करताना दिसत आहेत.
तसेच सरपंच यांच्या काही समर्थकांनी घराशेजारी कोबडे, बकरे कापण्याची दुकाने थाटून घरापुढे दुर्गंधी पसरविण्याचे कामे करताना दिसत आहेत.
ग्रामपंचायत स्थरावर केलेल्या कामाचे देयके काढण्यासाठी सदर ग्रामसेवक प.स कार्यालयात रोजच घिरट्या घालताना व अभियंताची मन धरणी करीत असल्याचे अनेकांकडून सांगीतले जात आहे.