
महिला पोलिस उपनिरीक्षक यांना 30 हजार रुपये लाच घेतांना पकडले रंगेहाथ
नागपुर ,
महीला पोलीस उपनिरीक्षक यांना 30 हजार रुपये लाच घेताना पकडले रंगेहाथ
नागपूर:- पोलीस दलात लाचखोरीच्या मोठ्या प्रमाणात उत आले आहे. येथे मागील 24 तासांत पोलिस अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याच्या दोन घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. त्यात महीला पोलीस पण मागे नसल्याचे दिसून येत आहे.
चोरीच्या गुन्ह्यातील आरोप टाळण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एका महिला पोलिस अधिकाऱ्याला 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केल्याने पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे. ज्योत्स्ना प्रभू गिरी असे या लाचखोर महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्या नागपूर जिल्हातील बुटीबोरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्त आहे.
लाचखोर आरोपी महिला पोलिस अधिकारी बुटीबोरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे आणि ती गुन्हे शोध पथकाची प्रमुख आहे. एक 26 वर्षीय तक्रारदार तरुण बुटीबोरी परिसरात राहतो. एमआयडीसी बोरी पोलिसांनी त्याच्या मित्राला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी ज्योत्स्ना गिरी यांच्यावर होती. पोलिसांना तक्रारदाराचा मोबाईल नंबर त्याच्या मित्राच्या मोबाईल फोनवर सापडला. म्हणून ज्योत्स्नाने तक्रारदाराला चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावले होते.
यावेळी पोलिसांनी चौकशीदरम्यान त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आला. त्याला चोरीच्या आरोपात अडकवण्याची धमकी देण्यात आली. त्याच्यावर खोटे आरोप दाखल करून त्याला तुरुंगात पाठवण्याची तयारी सुरू झाली. यामुळे तक्रार करणारा तरुण घाबरला. गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी ज्योत्स्नाने तक्रारदाराकडून 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोड झाल्यानंतर, तिने 30 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. तर तरुणाने ज्योत्स्ना विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती.
तरूणाने दिलेल्या तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केल्यानंतर, ज्योत्स्नाला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. गुरुवारी संध्याकाळच्या सुमासर ज्योत्स्नाने तक्रारदार तरूना कडून तिच्या खोलीत 30 हजार रुपयांची लाच घेताच, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिला रंगेहाथ पकडले. आता पुढील चौकशी असू असल्याची माहिती समोर आली आहे.