देश-विदेश
म्यानमारमधुन 900 कुकी अतिरेकी मणिपुरमघ्ये घुसले ; सुरक्षासल्लागारांनी दिला दुजोरा चिंता वाढली ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

म्यानमारमधुन 900 कुकी अतिरेकी मणिपुरमघ्ये घुसले ; सुरक्षासल्लागारांनी दिला दुजोरा चिंता वाढली ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
मणिपुर .
दिनांक 22/09/2024.
हिंसाचाराने ग्रासलेल्या मणिपूरमध्ये आता म्यानमारमधील अतिरेक्यांच्या घुसखोरीमुळे आता चिंता वाढली आहे. शेजारच्या म्यानमारमधून मणिपूरमध्ये ९०० कुकी अतिरेक्यांच्या प्रवेशाबद्दल आणि सशस्त्र ड्रोनच्या वापराबद्दल गुप्तचर अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत शनिवारी सुरक्षा सल्लागारांनी दुजोरा दिला आहे. मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या गुप्तचर अहवालाला हलक्यात घेता येणार नाही.