क्राईम
बदलापुर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

बदलापुर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 23/9/2024.
बदलापुर :-
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्याला ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला. आरोपी अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून घेतली. पोलिसांच्या व्हॅन मधून ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारील पोलिसाची बंदूक हिसकावून घेत गोळीबार केली. यात आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला. त्याचा मृतदेह कळवा हॉस्पिटलमध्ये नेला आहे. तर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असल्याने त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेल्याची माहिती आहे.
AkshayShinde #BadlapurNews