बालकृष्ण अजमेर यांनं त्वरित हटविण्याची मागणी!
मुख्य उपसंपादक :- स्वप्नील मेश्राम .

बालकृष्ण अजमेर यांनं त्वरित हटविण्याची मागणी!
दणका कायद्याचा न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
जिल्हा प्रतिनिधी)
गड.(दि.२४ सप्टेंबर).
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेले आणि याच शिक्षण विभागात गेली दहा ते पंधरा वर्षापासून दडी मारून बसलेले बालकृष्ण अजमेर यांना त्वरीत हटविण्याची मागणी सेवानिवृत्त उच्चश्रेणी.मुख्याध्यापक.श्री.पांडुरंग सेमस्कार यांनी एका निवेदनातून केलेली आहे.
पांडूरंग कीचुजी सेमस्कार हे उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून पंचायत समिती मूलचेरा येथून सेवानिवृत्त होऊन आज अंदाजे त्यांचे वयाला 80 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे.
पांडुरंगजी सेमस्कार यांनी
जिल्हा आदर्श शिक्षक एक वेतनवाढ सुधारित वेतनाची पडताळणी करून निवृत्ती वेतन निश्चित करणे याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे सुधारीत वेतनाचा प्रस्ताव सादर करून प्रस्तावाला एक वर्षाचा कालावधी होत असताना सुधा.
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील बाळकृष्ण अजमेर यांनी सुधारित वेतन निश्चितीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्याकडे अजून पर्यंत सादर न केल्यामुळे एका 80 वर्षीय वयोवृद्ध उच्च श्रेणी मुख्याध्यापकाला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सतत तोंड द्यावें लागत आहे .
आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी वयोवृद्ध उच्चश्रेणी मुख्याध्यापकानी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या सतत भेटी व त्यांना निवेदने सादर करून सुध्दा सेवानिवृत मुख्य ध्यापकाच्या दिलेल्या प्रस्तावावर कोणतीच कारवाई न केल्यामुळे उच्चश्रेणी मुख्याध्यापकाला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या पायऱ्या रोजच तुडविण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.जाणून बुजून व
हेतूपूरस्पर माझ्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले जात आहे .याला सर्वस्वी बालकृष्णा अजमेर हेच जबाबदार असल्याचे निवेदनातून नमूद केलेले आहे.
शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या अशा निष्क्रिय, बेजबाबदार वेळकाढू बाळकृष्ण अजमेर यांना त्वरित हटवण्याची मागणी सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग सेमस्कर यांनी केलेली आहे .