यवतमाळ मधे युवा कवी प्रभाकर देविदास दुर्गे यांचा सत्कार ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

यवतमाळ मधे युवा कवी प्रभाकर देविदास दुर्गे यांचा सत्कार ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
यवतमाळ ,
दिनांक 23/09/2024.
भिडेवाडा… देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कवी भिडेवाडाकार विजय वडवेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविल्या जात आहे.
त्यात दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोज रविवारला यवतमाळ जिल्हा अंतर्गत येणाऱ्या आर्णी तालुक्यात जिल्हास्तरीय एक दिवसीय कवीसंमेलनाचं आयोजन करण्यात आले होते. याच विषयात आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असलेले युवा कवी प्रभाकर देविदास दुर्गे मु. अडपल्ली चक. ता. मुलचेरा. जि. गडचिरोली यांनी सुद्धा या संमेलनात सहभाग नोंदविला होता. त्यांनी त्या संमेलनात आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भिडेवाडा बोलला ही कविता सादर करून संपूर्ण उपस्थित मान्यवर, कवी, कवयित्री व रसिक वर्गाची टाळ्यांची दाद मिळवत सर्वांची मने जिंकली.
एक नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असणारे अवघे आठविस वर्षाचे युवा कवी प्रभाकर दुर्गे यांनी आपल्या परिस्थितीला तोंड देत आंतरराष्ट्रीय स्तरावर उंच अशी गगन भरारी मारून आपल्या गावाचे, आपल्या जिल्ह्याचे, आपल्या राज्याचे, आपल्या देशाचे नाव रोशन केले आहे. त्याकरिता यवतमाळ जिल्हा कमिटीने भिडेवाडाकार विजय वडवेराव व उपस्थित मान्यवरांच्या हातून त्यांचा सत्कार केला.
त्यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, साहित्यिक सहकारी, गावकरी मंडळी या सर्वांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.