
पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांजचे नाव ; प्रस्तावाला राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 23/09/2024.
पुणे :-
लोहगाव विमानतळ अशीच आजपर्यंत ओळख असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आता ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ अशी होणार आहे. असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने सोमवारच्या बैठकीत मान्यता दिली. केंद्रीय सहकार तसेच नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेला हा प्रस्ताव त्वरित मंजूर करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात दिले होते.