
गावात सुरू केली चक्क SBI ची डुप्लीकेट शाखा ; नोकऱ्या देण्याच्या नावाने लाखो रुपये घेउन झाले
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
मुख्य संपादक :-संतोष मेश्राम
दिनांक 4/10/2024.
छत्तीसगड
छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, येथील एका गावात चक्क एसबीआयची डुप्लीकेट शाखा सुरू केली आणि या बनावट बँकेच्या शाखेच्या माध्यमातून लाखो रुपये घेऊन अनेकांना नोकऱ्या दिल्या होत्या. मनोज अग्रवाल नावाची व्यक्ती कियोस्क शाखा उघडण्यासाठी अर्ज करण्यासाठी आली तेव्हा ही घटना उघडकीस आली. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार आहेत. कोरबा व कावर्धा येथील अनेकांची लाखोंची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.