देश-विदेश
ट्रम्प यांनी करायचे तेच केले ; भारतीयांची दुसरी व तिसरी तुकडी हातापायात बेड्या घालून परत पाठवली
मुख्य संपादक संतोष मेश्राम

ट्रम्प यांनी करायचे तेच केले ; भारतीयांची दुसरी व तिसरी तुकडी हातापायात बेड्या घालून परत पाठवली
दिनांक 18/2/25.
अमेरिका ,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेतून पाठ फिरताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने अवैधरीत्या अमेरिकेत प्रवेश केलेल्या अनुक्रमे ११९ व ११२ भारतीयांची दुसरी व तिसरी तुकडी आधीसारखीच हातापायात बेड्या घालून परत पाठवली. आधीच्या १०४ भारतीयांना दिल्या गेलेल्या अशा अमानवी वागणुकीबद्दल देशात संताप व्यक्त झाला होता. पंतप्रधान मोदी त्यांच्या अमेरिका दाैऱ्यात ट्रम्प यांच्याशी बोलून ही वागणूक थांबवतील किंवा भारतच आपल्या नागरिकांसाठी विशेष विमान पाठवून त्यांना परत आणील, असे बोलले जात होते. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही.