देश-विदेश
चोरीची अनोखी घटणा ; ना पैसा ना दागिने , चोरट्यांनी लंपास केली 10 लाख रुपयांची कबुतरे
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

चोरीची अनोखी घटणा ; ना पैसा ना दागिने , चोरट्यांनी लंपास केली 10 लाख रुपयांची कबुतरे ।
दिनांक 18/2/25.
उत्तरप्रदेश,
आतापर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. चोर पैसे, दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू चोरतो. पण, उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये चोरीची अनोखी घटना घडली आहे. चोरांनी चक्क घराच्या छतावरुन 400 कबुतर चोरले. ही घटना मेरठमधील लिसाडी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील लिसाडी गावात घडले. कबुतरांच्या मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी कबुतर चोरणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.