Breaking
ब्रेकिंगसोमनपल्ली

सोमनपल्ली बस स्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आक्षेपार्य लिखाण प्रकरणी बौद्ध बांधवाकडुन जाहिर निषेध।

मुख्य संपादक संतोष मेश्राम .

 

सोमनपल्ली बस स्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आक्षेपार्य लिखाण प्रकरणी बौद्ध बांधवाकडुन जाहिर निषेध।

आष्टी पोलीस स्टेशनवर धडक ,

आझाद समाज पार्टी युवा आघाडी ,व सोमनपल्ली परीसरातील संपूर्ण बौद्ध बांधव आक्रमक

__________________
युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांची कार्यकर्त्यांसह तसेच सोमनपल्ली व परीसरातील संपूर्ण बौद्ध बांधवाची आष्टी पोलीस स्टेशनवर धडक : प्रशासनाला 24 तासाचा अल्टिमेट
_________________

गडचिरोली ,चामोशीँ ,

सोमनपल्ली ,

दिनांक 21/2/2025.

 

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी जवळ असलेले सोमनपल्ली या गावच्या बस स्टैंड वर काही जातीयवादी नराधमांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयक अत्यंत अपमान जनक व आक्षेपार्य विकृत विधान लिहिलेले आढळले आहे. सदर कृत्य हे अत्यंत निंदनीय असून आझाद समाज पार्टी युवा आघाडीच्या वतीने या कृत्याचा तीव्र निषेध करून आजाद समाज पार्टी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे परिसरातील संपुर्ण बौद्ध बांधव नागरिकांसह आष्टी पोलीस स्टेशन वर धडक दिली.

 

 

 

 

 

आणि या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ दोषीवर अतिशय कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली .

 

 

निवेदन देतांना 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कुण्या विशिष्ट जातीचे महापुरुष नसून तथा त्यांनी भारताला दिलेले संविधान हे कुण्या एका विशिष्ट जातीसाठी नाही तर समस्त बहुजनांच्या व भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या हक्क -अधिकाराचे प्रतीक आहे. आणि अशा प्रकारचे तुच्छ कृत्य करून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे हे षडयंत्र असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये यामागे कुणाचे तरी षडयंत्र असल्याचा आरोप युवा आघाडी अध्यक्ष विवेक खोब्रागडे यांनी केला. आणि सदर प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगाराला 24 तासात शोधून कठोर कारवाई करावी अन्यथा आजाद समाज पार्टी युवा आघाडी तथा सोमनपल्ली गावातील सर्व बौद्ध बांधव, येनापुर, सगणापुर ,आष्टी ,किष्टापुर येनापुर, आंबोली ,वायगाव असे अनेक ठिकाणाहून आलेले बौद्ध बांधव ,सामाजिक कार्यकर्ते तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना एएसपी कार्यकर्त्यांसह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

 

 

या घटणेचा सोमनपल्ली व परीसरातील संपूर्ण बौद्ध उपासक उपासीका निषेध करून आष्टी पोलीस स्टेशनवर धडक…

 

 

तसेच सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आष्टी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विशाल काळे व वरिष्ठ अधिकारी सोमनपल्ली येथे बौद्ध बांधवाची भेट घेतली आणि सांगितले की सेलुर कडे जाणाऱ्या मार्गे असे नग्न अवस्थेतील चित्र काढले आहे. व आंबोली जि.प.शाळा तिथे अपशब्दात भितींवर लिहुन आहे,असे बौद्ध बांधवांना आष्टी पोलिसांनी सांगितले ,आणि या सर्व  ठिकाणी लिहिणारा एकच व्यक्ती आहे आम्ही शोधात आहो ,उद्या आंदोलन करु नका आम्ही त्यां जातीयवादी च्या शोधात आहोत, आम्ही लवकरच ताब्यात घेऊ असे बोलले आहे असे बौद्ध बांधवाकडून सांगितले जात आहे.

तसेच आष्टी पोलीसाकडे सर्व  परीसरातील बौद्ध बांधवाची नजर लागली आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे