
पोलीस व नक्षली चकमकीत पाच नक्षली जागीच ठार ।
अन्न व औषधीप्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या दौऱ्या दरम्यानची घटना,
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम गडचिरोली
भामरागड; (गडचिरोली)
तालुक्याला लागून छत्तीसगड राज्य सीमेवरील कोठी पोलीस स्टेशन हद्दीतील कोपर्शी गाव जंगल परिसरात पोलिसांकडून नक्षलविरोधी अभियान राबवितांना पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षल्यांचा खात्मा करण्यात पोलिसांनी यश आले आहे.
सदरच्या चकमकीत एक सुरक्षा जवान जखमी झाल्याची माहिती आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे आज भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर असून चकमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. हे विशेष!
कोपर्शी गाव जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना गुप्तचर यंत्रणा द्वारे प्राप्त झाली होती. त्यावरून (ता. २१ ऑक्टोंबर) सोमवारी पोलिसांच्या नक्षल शोध अभियान पथकाने मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवत असतांना दुपारी एक वाजता दरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला प्रत्युत्तरात पोलीस जवानांनी नक्षल्यांविरुद्ध चोख प्रत्युत्तर दिले. यात पाच नक्षल्यांचा खात्मा झाला असून एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.