कोरोनातुन बर झालेल्या लोकांना हार्ट अटँक ,स्ट्रोकचा दुप्पट धोका ?; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

कोरोनातुन बर झालेल्या लोकांना हार्ट अटँक ,स्ट्रोकचा दुप्पट धोका ?; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज ।
दिनांक 23/10/2024.
अमेरिका .
कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक देशांत अजूनही लोक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. कोरोनाचं संकटं अद्याप पूर्णपणे टळलेलं नाही. नुकत्याच प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे की जे लोक कोरोनापासून बरे झाले आहेत त्यांना हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा दुप्पट धोका असू शकतो.
अमेरिकन शास्त्रज्ञांनी हा रिसर्च केला असून तो गेल्या आठवड्यात प्रकाशित झाला आहे. या रिसर्चमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग झालेल्या १० हजार लोकांवर संशोधन करण्यात आले. ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे त्यांना हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा मृत्यूचा धोका दुप्पट आहे. युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या प्रोफेसर एंजेला क्लर्क यांनी याबाबत माहिती दिली.