मुंबई
मृतदेहा सोबत लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही; सुप्रीम कोर्टाची मोठी टिपणी
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम .

मृतदेहा सोबत लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही; सुप्रीम कोर्टाची मोठी टिपणी..
दिनांक 6/2/2025.
मुंबई,
भारतीय दंड संहितेत नेक्रोफिलिया म्हणजेच मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा मानला जात नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. बलात्काराच्या तरतुदीत जर एखाद्या महिलेच्या इच्छेविरूद्ध तिच्याशी लैंगिक संबध ठेवणे बलात्कार मानले जाते, त्याच आधारे मृत शरीरही सहमती देऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्याशीही लैंगिक संबंध ठेवणे बलात्कार मानले जावे अशी मागणी केली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने हा युक्तिवाद मान्य केला नाही. नेक्रोफिलिया भारतीय दंड संहितेत गुन्हा मानला जात नाही. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशात आम्ही बदल करू इच्छित नाही असं कोर्टाने स्पष्ट केले.