
मुंबई झाले थंड हवेचे ठिकाण ,13 वर ; महाबळेश्वरलाही टाकले मागे !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 12/12/2024.
मुंबई ,
दमट हवा आणि सतत घामाच्या धारांना सरावलेल्या मुंबईकरांना थंडीचे मोठे अप्रूप. त्यामुळे हिवाळ्याची ते आवर्जून वाट पहात असतात. दिवाळीनंतर आलेल्या थंडीने या महानगरात बस्तान बसवले असे वाटत असतानाच पुन्हा गरमीने डोके वर काढले होते. मात्र, या गरमीवर मात करून आता पुन्हा थंडी परतली असून, मुंबईचा पारा चक्क १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीचा हा परिणाम असून, झोंबणारी ही थंडी मुंबईकरांना आणखी काही दिवस अनुभवायला मिळणार आहे.