गरीबीमुळे सोडलेल्या पतीला 22 वर्षांनी झाला मालामाल ; पत्नीला कळताच पत्नी परतली अन् पैसे घेऊन झाली पसार…
मुख्य उपसंपादक एस.पि. मेश्राम .

गरीबी मुळे सोडलेला पती 22 वर्षांनी झाला मालामाल, पत्नीला कळताच पत्नी परतली अन पैसे घेऊन झाली पसार…..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि.31/7/24.
ऱ्य
उत्तर प्रदेशातील झाशी इथं २२ वर्षापूर्वी एका पत्नीनं पतीची साथ सोडली. त्यावेळी पती आर्थिक संकटात अडकला होता. गरिबीशी संघर्ष करणाऱ्या पतीला एकटं सोडून पत्नी मुलांसह निघून गेली. परंतु अचानक ती पत्नी आज परतली कारण पतीला वारसा हक्कानं मिळालेल्या जमिनीवर बुंदेलखंड विकास प्राधिकरणानं हस्तांतरित केली. त्या बदल्यात त्याला २८ लाख रुपये मिळाले.
पतीजवळ इतके पैसे येताच पत्नी पुन्हा त्याच्याजवळ आल्याचा प्रकार घडला आहे. तु पतीला तिच्याबरोबर जायचं नव्हतं. त्यामुळे पत्नी आणि तिच्या मुलांनी मिळून वृद्धाकडून दीड लाख रुपये हिसकावून पळून गेले. याबाबत पीडित पतीने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. झाशी मुख्यालयापासून २० किमी अंतरावरील सारमऊ गावात ही घटना घडली आहे.