
कर्नाटकाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बालकर यांच्या कारचा भिषण अपघात, सुदैवाने जीवीतहाणी टळली ….
दिनांक 15/01/2025.
कर्नाटक,
कर्नाटकमधील काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य सरकारमधील मंत्री लक्ष्मी हेब्बालकर यांच्या कारला आज सकाळी मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात लक्ष्मी हेब्बालकर या बालंबाल बचावल्या. मात्र कारमधून प्रवास करत असलेले लक्ष्मी हेब्बालकर यांचे भाऊ आणि आमदार चेन्नाराजू हे जखमी झाले आहेत. या दोघांनाही उपचारांसाठी त्वरित एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.