
नाशिक अपघातातील मृतांना मुख्यमंत्र्यांनी दिली श्रद्धांजली ; कुटुंबियांना 5 लाखाच्या मदतीची घोषणा …
दिनांक 15/01/2025
नाशिक मुंबई ,
नाशिक-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल आणि जखमींवरील उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.