चिखलात ट्रॅक्टर उलटून ,ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू.
ग्रामीण प्रतिनिधी कोनसरी :- इंद्रजीत गोडबोले ✍️✍️

चिखलात ट्रॅक्टर उलटून ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू*
ग्रामीण प्रतिनिधी कोनसरी
इंद्रजीत गोडबोले ✍️✍️
गडचिरोली ./ (चामोशीँ )
सोमनपल्ली ग्रामपंचायत मधील येत असलेल्या घर्मपुर गावातील घटणा.
चामोर्शी :- तालुक्यातील धर्मपुर येथील नामे वामन ठाकुर वय अंदाजे (५२) वर्षे असुन स्वतःची मालकीची ट्रॅक्टर चिखलटीसाठी वायगाव , कन्हाळगाव या परिसरात रोवनीचे काम सुरू असल्याने आणि चिखलटी करण्यासाठी वामन ठाकुर यांना ट्रॅक्टर घेवुन बोलावण्यात आले असल्याने स्वतःची ट्रॅक्टर घेवुन गेले व चिखलटी करताना ट्रॅक्टर चिखलात फसल्याने ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर काढण्यासाठी प्रयत्न करत असताना उलट ट्रॅक्टरच उलटल्याने ट्रॅक्टर चालक वामन ठाकुर हा जागीच ट्रॅक्टर मध्ये दबल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. तसेच त्यांच्या मागे दोन मुले व पत्नी असा परीवार असुन धर्मपुर गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे व शोककळा पसरली आहे.