देश-विदेश
ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय; अमेरिकेत घुसखोरी केलेल्या 204 नागरिकांना विमानाने भारतात परत पाठवलं
मुख्य संपादक

ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय; अमेरिकेत घुसखोरी केलेल्या 204 नागरिकांना विमानाने भारतात परत पाठवलं
दिनांक 6/2/2025.
अमेरिका ,
अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यापासून तेथील यंत्रणांनी घुसखोरांना शोधण्यास सुरुवात केली आहे.अमेरिकेत हे लोक कोणत्याही कागदपत्रांशिवाय राहत आहेत. अशा लोकांना पकडून त्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात येत आहे. हा सर्व खर्च अमेरिकाच करत आहे. आज २०५ भारतीयांना अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने झेपावले आहे. ट्रम्प यांनी या अवैध प्रवाशांना देशाबाहेर काढण्यासाठी सैन्याची मदत घेतली आहे.