
अपघातातून थोडक्यात बचावली सौरभ गांगुलीची लेक सना ; बसचा पाठलाग करून चालकाला पकडलं ।
दिनांक 5/01/2024
कोलकाता ,
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली हिचा शुक्रवारी (3 जानेवारी) संध्याकाळी कोलकाता येथे मोठा अपघात झाला. डायमंड हार्बर रोडवर बसने सना गांगुलीच्या कारला जोरदार धडक दिली. अपघातावेळी सना कारमध्ये उपस्थित होती आणि तिचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. धडकेनंतर बसचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पकडला गेला. सध्या आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.