Breaking
राजकियसावली

सावली तालूक्यातील विकास कामांना विजयभाऊंचा हात. तालुक्यातील ३ कोटी रुपयांच्या विकास-कामाचे लोकार्पण… घोसेखुर्द प्रकल्पातील अनेक गरजू व गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न लागणार निकाली

मुख्य संपादक

 

सावली तालूक्यातील विकास कामांना विजयभाऊंचा हात.

तालुक्यातील ३ कोटी रुपयांच्या विकास-कामाचे लोकार्पण.

घोसेखुर्द प्रकल्पातील अनेक गरजू व गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न लागणार निकाली.

दिनांक :- २८ जानेवारी २०२४

दणका कायद्याचा डिजिटल न्युज

सावली :- राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आज सावली तालुक्यातील ३ कोटी  रुपयांचा विकास- कामांचे लोकार्पण केलेले आहेत.तालुक्यातील मौजा पालेबारसा येथे शेतकऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात गोसेखुर्द विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी बैठक बोलावून तातडीने गरजू व गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या आहेत,यामुळे शेतकरी बांधवानी मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे आभार मानले.

*करोली ता. सावली येथे महा.ग्रा.रो.हमी योजना अंतर्गत (१४ लक्ष रू.) मंजूर झाले असून जि.प. शाळा ते कोंडवाडा व ईश्वर लोणारे ते दौलत लोणारे पर्यत सिमेंट कॉकीट रोडचे लोकार्पण तसेच कसरगांव ता. सावली येथे आगमण व महा.ग्रा.रो. हमी योजना अंतर्गत (३० लक्ष रू.) मंजूर झाले आहेत, प्रकाश चुधरी ते प्रभाकर भोयर व हरीदास चौधरी ते उद्धव भोयर यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रोडचे लोकार्पण मा.आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

*मौजा.विहीरगांव ता. सावली येथे आगमण व महा.ग्रा.रो.हमी योजना अंतर्गत (२५ लक्ष रू.) मंजूर अंगलवार मेडिकल्स ते मन रोड पर्यत सिमेंट कॉकीट रोडचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.विहीरगांव वरून निफंद्रा ता. सावली येथे आगमण व २५१५ लेखाशिर्ष योजनेअंतर्गत (३५ लक्ष रू.) मंजूर मौजा निफंद्रा येथे सभागृहाचे बांधकामाचे भुमिपूजन तसेच निफंद्रा वरून अंतरगांव ता. सावली येथे आगमण व २५१५ लेखाशिर्ष योजनेअंतर्गत (३५ लक्ष रू.) मंजूर मौजा अंतरगांव येथे सभागृहाचे बांधकामाचे भुमिपूजन कार्यक्रमास मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी  उपस्थिती दर्शवली,मौजा.अंतरगांव वरून निमगांव ता. सावली येथे आगमन  व २५१५ लेखाशिर्ष योजनेअंतर्गत (३५ लक्ष रू.) मंजूर मौजा निमगांव येथे सभागृहाचे बांधकामाचे भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती होती.ब्रम्हपुरी मतदारसंघातील सावली तालुक्यातील मौजा मेहाखुर्द गावातील रस्ता काँक्रिटीकरन काम पूर्ण झाले असून सदर कामाचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी गावातील नागरिकांच्या भेटी घेऊन पुढील विकासकामाचे नियोजन सुद्धा करण्यात आले. बोरमाळा येथे अंदाजे ११ लक्ष रुपयांचे विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.

*मौजा निमगांव येथे महा.ग्रा.रो.हमी योजना अंतर्गत (४० लक्ष रू.) मंजूर शामराव गंडाटे ते लालाजी समर्थ व मारोती शालीग्राम करकाडे ते पार्वताबाई वन्नेवार व निलकंठ झाडे ते होमराज झाडे व सदाशिव भोयर ते पुंडलिक खेवले यांचे घरापर्यंत सिमेंट कॉकेट रोड बांधकामाचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर अंतरगांव वरून निमगांव ता. सावली येथे आमण व २५१५ लेखाशिर्ष योजनेअंतर्गत (३५ लक्ष रू.) मंजूर मौजा निमगांव येथे सभागृहाचे बांधकामाचे भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.

मौजा निमगांव येथे महा.ग्रा.रो. हमी योजना अंतर्गत (४० लक्ष रू.) मंजूर शामराव गंडाटे ते लालाजी समर्थ व मारोती शालीग्राम करकाडे ते पार्वताबाई वन्नेवार व निलकंठ झाडे ते होमराज झाडे व सदाशिव भोयर ते पुंडलिक खेवले यांचे घरापर्यंत सिमेंट कॉकेट रोड बांधकामाचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती होती, आज सावली तालुक्यातील ३ कोटी रुपयांचा विकास-कामाचे लोकार्पण राज्याचे विरोधी पक्षनेते,सावली -ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते  करण्यात आले

यावेळी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मा.राजूभाऊ सिद्धम, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने, महिला तालूका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,सिंदेवाहीचे नगराध्यक्ष मा.स्वप्नील कावळे,विधानसभा युवा उपाध्यक्ष मा.नितीन दुवावार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.निखिल सुरमवार,संचालक मा.खुशाल लोडे,चिंचबोडीचे सरपंच मा.सतीश नंदगिरवार,मा.केशव भरडकर,मा.अनिल म्हशाखेत्री,मा.अनिल गुरनुले,मा.दिलीप फुलबांधे,मा.सचिन इंगुलवार,मा.श्रीकांत संगीडवार, युवक काँग्रेस उपाध्यक्ष मा.वैभव गुज्जनवार, मा.सुशील दहलकर,मा.मोहित मेश्राम तसेच इतर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व. कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे