क्राईम
वाघ बिबट्याच्या अवयवांची विक्री करणारे आरोपी जाळ्यात ; गोंदियात 3 जणांना घेतले ताब्यात ।
मुख्य संपादक

वाघ बिबट्याच्या अवयवांची विक्री करणारे आरोपी जाळ्यात ; गोंदियात 3 जणांना घेतले ताब्यात ।
गोंदिया ,
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून वाघ, बिबट्याची शिकार करून त्यांच्या अवयवांची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना सडक अर्जुनी येथून ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (दि.१९) केली. आरोपींमध्ये विठ्ठल मंगरू सराटी (रा. दल्ली हल्दीटोला, सडक अर्जुनी), हरीश लक्ष्मण लांडगे (रा. मुंडीपार, सडक, ता. साकोली, जि. भंडारा), घनश्याम शामराव ब्राह्मणकर (रा. पिपरी राका, ता. सडक अर्जुनी) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.