लॉयड्स मेटल्स एनर्जी लिमिटेड कोनसरी तथा लॉयड्स इन्फिनिट फाऊंडेशन द्वारा कोनसरी येथे तालुका स्तरीय कब्बडी !
येनापुर प्रतिनिधी : आकाश बडावार

लॉयड्स मेटल्स एनर्जी लिमिटेड कोनसरी तथा लॉयड्स इन्फिनिट फाऊंडेशन द्वारा कोनसरी येथे तालुका स्तरीय कब्बडी !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
येनापुर प्रतिनिधी
आकाश बंडावार
कोनसरी :/
१८ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२३ दरम्यान लॉयड्स मेटल्स एनर्जी लिमिटेड कोनसरी तथा लॉयड्स इन्फिनिट फाऊंडेशन द्वारा चामोर्शी तालुका स्तरीय जुनिअर कब्बडी चामियनशिप स्पर्धा कोनसरी येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये अंडर १४,अंडर १७ आणि अंडर १९ अशा वयोगटात स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेत संपूर्ण चामोर्शी तालुक्यातील 110 संघानी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
तीन दिवशीय चाललेल्या या स्पर्धेचे अंतिम सामने २० ऑक्टोबर सायंकाळच्या सुमारास घेण्यात आले. यात अंडर १४ वयोगटात मुलांमध्ये राष्ट्रसंत आष्टी संघ ,तर मुलींमध्ये लॉयड्स स्पोर्ट्स अकॅडेमीचा संघ विजयी ठरला. अंडर १७ वयोगटात मुलांमध्ये चामोर्शी आर. के. संघ तर , मुलींमध्ये लक्ष्मणपूर हा संघ विजयी ठरला आणि अंडर १९. वयोगटात मुलांमध्ये राष्ट्रसंत आष्टी संघ तर मुलींमध्ये चामोर्शी संघ विजयी ठरला.
संपूर्ण स्पर्धेच्या बक्षिस वितरनाला प्रमुख अतिथी म्हणून कंपनीचे अधिकारी सारंग पुणेकर, संजय पोतराजवार, रशमीकांत शाहू, पाल्लानास्वामी , राकेश घराई यांनी उपस्थिती दर्शविली. स्पर्धेचे संपूर्ण आयोजन कर्नल महापात्रा यांच्या मार्गदर्शना खाली स्पोर्ट व सामाजिक दायित्व विभागा तर्फे करण्यात आले.