देश-विदेश
शेतात जाण्यासाठी रस्ता नाही; एक हेलिकॉप्टर द्या” , शेतकऱ्याची प्रशासनाकडे अनोखी मागणी !
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

शेतात जाण्यासाठी रस्ता नाही; एक हेलिकॉप्टर द्या” , शेतकऱ्याची प्रशासनाकडे अनोखी मागणी !
दिनांक 27/2/2025.
मध्यप्रदेश ,
मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने सुनावणीदरम्यान कलेक्टरना एक अनोखी विनंती केली आहे. त्याने त्याच्या शेतात जाण्यासाठी प्रशासनाकडे हेलिकॉप्टरची मागणी केली.
जिल्ह्यातील सरजना गावातील रहिवासी असलेला तरुण शेतकरी संदीप पाटीदार याने जनसुनावणीत विनंती केली की, गेल्या दहा वर्षांपासून त्याच्या शेतात जाण्याचा रस्ता गुंडांनी रोखला आहे. शेती करण्यासाठी जाऊ शकत नाही. कनिष्ठ न्यायालयानेही जुना रस्ता सुरू करण्याचा आदेश दिला होता, परंतु तहसीलदार आदेशाची अंमलबजावणी करत नाहीत.