आरोग्य व शिक्षणमुंबई
वडिलांचं सायकल दुरुस्तीचं दुकानं , कष्टाची जाणीव ठेऊन मुलानं दहावीत मिळविले 94 टक्के …
मुख्य संपादक

वडिलांचं सायकल दुरुस्तीचं दुकानं , कष्टाची जाणीव ठेऊन मुलानं दहावीत मिळविले 94 टक्के …
मुंबई,
दि.15/5/25.
मुंबईतील कांदिवलीतील काजूपाडा परिसरात राहणाऱ्या एका मुलाने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून आई-वडिलांच्या कष्टायचे चीज केले. किशन ठाकूर, असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. किशनने सरकारी शाळेत शिक्षण घेतले असून त्याच्या वडिलांचे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. किशनच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही त्याने जिद्द सोडली नाही आणि दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले.