
सर्वोच्च न्यायालयाचा नवा ध्वज….
दि.1 सप्टेंबर 2024.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दि.1 सप्टेंबर 2024 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ व्या वर्धापनदिनाच्या स्मरणार्थ नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले.या नवीन ध्वजात अशोक चक्र,सर्वोच्च न्यायालयाची ईमारत आणि भारतीय संविधान दाखविण्यात आले आहे.भारताचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड हे यावेळी उपस्थित होते.
या नवनिर्मित ध्वजावर संस्कृत श्लोक “यतो धर्मस्ततो जय:” असे लिहिण्यात आले आहे याचा अर्थ असा कि “जेथे धर्म असेल तेथे विजय होईल”.आपले भारतीय संविधान हे सर्वधर्मसमभावाची शिकवणूक देते.आजच्या आधुनिक आणि वैज्ञानिक युगात धर्माशिवाय विजय प्राप्त होऊ शकत नाही का,भारतीय न्यायव्यवस्था ही धर्मावर आधारित आहे का आणि आजच्या भारत सरकारला प्रत्येक शासकीय कार्यात धर्म का हवासा वाटतो.
प्रविण साळुंके
नालासोपारा(बुद्धभूमी)