डॉ. सुमीत भसारकर यांचे आज नागपुरात निधन…
मुख्य संपादक:-संतोष मेश्राम

ब्रेकिंग न्युज ,
दु:खद बातमी
डॉ. सुमीत भसारकर यांचे आज नागपुरात निधन…
दिनांक 13/01/2025.
गडचिरोली / मुधोली चक नं. 2
चामोशीँ तालुक्यातील कोनसरी प्राथमिक आरोग्य केद्र अंतर्गत येत असलेल्या उपकेंद्र मुधोली चक नं 2 येथे CHO म्हणून कार्यरत असलेले डॉ. सुमीत भसारकर यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना आपल्या स्व :गाहुन गोंडपिपरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठि नेले असता तेथील डॉ. यांनी चंद्रपूर येथे हलविण्यास सांगितले. चंद्रपूरवरुन सुद्धा नागपुरला नेण्याचे सांगितले.व नागपुरला उपचारासाठी नेले परंतु तेथील डॉ. मृत घोषित केले, डॉ. सुमीत भसारकर यांच्यावर उपचार न होताच त्यांची आज दिनांक 13/01/2025 ला.नागपुर हाँस्पिटल येथे प्राणज्योत मावळली . आरोग्य विभागातील एक हिरा सोडुन गेला.. हि बातमी आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना कळताच सर्वानी टोह फोडला ! अतिशय खुप छान त्यांचा स्वभाव, त्याची खुप स्वप्ने होती स्वतः च आईला घेऊन गोडपिपरी ला घरबांकाम करत होते परंतु काळाने सुमीतला हिरावून नेले , सुमीतचे स्वप्ने स्वप्नेच राहिले , मनमिळाऊ ,आरोग्य सेवेत तत्पर सेवा देणारे सर्वांचे लाडके डॉ. सुमीत अवघ्या वयाच्या 26 व्या वर्षी सोडुन गेले.
त्यांच्या पाठिमागे आई,मोठे भाऊ,वहिनी व भसारकर असा परीवार आहे .आरोग्य विभागात सर्व त्र हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. सुमीत यांच्या आत्माला शांती लाभो यासाठी प्रार्थना केली आहे. आरोग्य विभागात व गावात शोककळा पसरली आहे .