जिल्हाधिकारी यांच्या कडुन आज गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना 22 जुलै सोमवार ला सुट्टी केली जाहीर ..
मुख्य संपादक

जिल्हाधिकारी यांच्या कडुन आज गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना 22 जुलै सोमवार ला सुट्टी केली जाहीर ..
गडचिरोली:-
दि.22/7/24.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवार ला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे प्रादेशिक हवामान विभागाने सुचित केल्यानुसार जिल्ह्यातील त्या त्या भागाचा आढावा घेऊन त्या स्थानीक क्षेत्रात शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत .
गेल्या तीन दिवसांपासून ढगफुटी सुरू असल्याने जिल्ह्यातील वैनगंगा , गोदावरी, प्राणहिता,बांडीया,इंद्रावती इत्यादी नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात नदी नाल्यांना पुर आल्याने ३७ मार्ग बंद आहेत शिवाय गोसेखुर्द धरणातून सध्या सुरू असलेले विसर्ग वाढविण्याची दाट शक्यता असल्याने जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देने आवश्यक आहे .
त्यामुळे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, महाविद्यालये, औद्योगीक प्रशिक्षण संस्था अशा सर्व शाळांना २२ जुलै सोमवार ला सुट्टी जाहीर केली आहे. सदर माहिती सर्व विभागांना पाठविण्यात आली आहे .
पुन्हा २४ तास पाऊस संततधार कोसळण्याची चिन्हे असल्याने बाहेर गावाहून आवागमन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.