सतत धो धो पाऊसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला…
मुख्य संपादक

सतत धो धो पाऊसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला…
दणका काद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली:-
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे .
जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगफुटी झाली असल्याचे चित्र दिसूत येत आहे आणि संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहेत जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा,वडसा (देसाईगंज), आरमोरी, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली,अहेरी, भामरागड, सिरोंचा आदी तालूक्यात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची अपरिमीत हाणी झाली आहे . शेतकऱ्यांचे सर्व पीके पाण्याखाली तीन दिवसांपासून असल्याने पीके सडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होऊन पुढे काय होणार या विवंचनेत सापडला आहे .
जिल्ह्यातील ३० ते ३५ मार्ग नदीनाल्याच्या पुरामुळे बंद झाले आहेत तसेच जिल्ह्याला लागून असलेल्या जिल्ह्यांनी सुद्धा संपर्क तुटला आहे अशा परिस्थितीत एखाद्या अति आजारी रुग्णांना मोठ्या प्रमाणावर त्रास संभवतो आहे .
शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करणं सुद्धा शक्य नाही त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई शासन देणार काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.