
चिंताजनक ! रहस्यमय आजाराने 17 जनांचा मुत्यू ,जम्मुतील गाव बनल ‘ कंटेनमेंट झोन ‘!
जम्मू काश्मीर ,
दिनांक 22/01/25.
जम्मू आणि काश्मीरमधील राजौरीमध्ये गूढ आजार पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. राजौरी विभागातील बधाल गावात या गंभीर आजारामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले सर्व १७ जण तीन वेगवेगळ्या कुटुंबातील होते. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सरकारने संपूर्ण गावाला ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित केलं आहे.
कंटेनमेंट झोन घोषित केल्यानंतर, या गावातील लोक कोणताही सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रम आयोजित करू शकणार नाहीत किंवा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत. इतक्या मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही, एक व्यक्ती अजूनही या आजाराने ग्रस्त आहे आणि त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.