
चक्क शाळेच्या सभेतच, दोन शिक्षकांनी केली मारामारी।
चंद्रपूर
बल्लारपुर
बल्लारपुर नगरपरिषदेच्या साईबाबाप्राथमिक शाळेत शैक्षणिक सभेदरम्यान दोन शिक्षकात वादावादी होऊन हाणामानी झाल्याची घटना दिनांक 27 घडली आहे.व या प्रकारची उघडतीस आली.तेव्हा मुख्याधिकाऱ्यानी एका शिक्षकाला निलंबित केले.दिलीप आत्राम निलंबित शिक्षकाचे नाव आहे.
बल्लारपुर नगर परीषद प्राथमिक शाळा शिक्षकांची 26/एप्रिल 2024.रोजी साईबाबा प्राथमिक शाळेत सभा आयोजीत करण्यात आली होती.सभेत शैक्षणिक विषयावर चर्चा झाली.दरम्यान दिलीप आत्राम व श्रीनिवास रायला या दोन शिक्षकामघ्ये जोरदार वाद झाला.तसेच लाथाबुक्क्यांनी मारझोड केली.दरम्यान आरोपी शिक्षक आत्राम यांनी जीवेमारण्याची धमकी दिली.अशी तक्रार शिक्षक रायला यांनी मुख्याधिकारी व पोलीस स्टेशन ला दिली असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.तर मुख्याधिकारी शिक्षक दिलिप आत्राम यांचेवर निलंबिताची कारवाई केली आहे.