
प्रियकराला लग्नाची मागणी घालताच प्रियकर झाला पसार दिड वर्षापासुन होते प्रेम संबंध ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
प्रेमात अखंड बुडालेल्या तरुणीवर केला वर्षभर अत्याचार।
गडचिरोली
आरमोरी
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील एका तरुणाने प्रेमात अखंड बुडालेल्या तरुणावर वर्षभर अत्याचार तर केलाच परंतू तरुणीने लग्नाची गळ घालताच प्रियकर मात्र पसार झाला आहे. हा प्रकार मागील दीड वर्षांपासून सुरू असल्याचे उघड झाले आहे. जेव्हा या तरुणाने लग्नाला नकार दिला. तेव्हा या पीडित तरुणीने आरमोरी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून, आरोपी फरार आहे. शुभम बबन सोरते (वय 27, रा. आरमोरी-बर्डी) असे फरार आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभमची मागील दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम, फेसबुक) माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या जिल्ह्यातील एका तालुक्यातील 21 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊन नंतर प्रेम जुळले.
यातूनच त्यांच्यात सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची 2023 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. 2023 पासून ते मे 2024 पर्यंत सुरू असलेल्या प्रेमादरम्यान त्यांनी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तत्पूर्वी या दोघांनी प्रेमाच्या व लग्नाच्या आणा भाकासुद्धा घेतल्या होत्या मे 2024 नंतर सदर तरुणी ही 21 वर्षांची होताच फिर्यादी तरुणीने लग्न करण्यासाठी शुभम सोरते याच्याकडे आग्रह धरला. मात्र, शुभमने लग्नाला स्पष्टपणे नकार दिला. सदर तरुणीने दोनदा तडजोडीअंती दोन्ही घरच्यांच्या मंडळींची सभा बोलावली मात्र निष्पन्न निघण्यासाठी तरुणाने बेजबाबदारपणा दाखविला त्यामुळे तळजोळ होऊ शकली नाही.तेव्हा वैतागून सदर पिडीत तरुणीने पोलीस स्टेशन गाठले.