देश-विदेश
चपाती उशीरा मिळाल्यांन भडकला नवरदेव ,मंडपातून फरार होऊन दुसऱ्या तरूणींंशी केले लग्न ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

चपाती उशीरा मिळाल्यांन भडकला नवरदेव ,मंडपातून फरार होऊन दुसऱ्या तरूणींंशी केले लग्न ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 30/12/2024.
उत्तर प्रदेश ,
लग्नासंबंधी अनेक घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून लग्न मोडलं जातं. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या मुगलसराय येथील एका गावात आलं असून वरातीला जेवण उशीरानं दिल्यानं नवरदेव भडकला आणि त्यानं लग्न करण्यासच नकार दिला.
हा वाद इतका वाढला की, नवरदेव लग्नातून फरार झाला.काही तासांनंतर तरूणाचं लग्न त्याच्या एका नातेवाईकाच्या मुलीसोबत लावून देण्यात आलं. नवरीकडील लोकांना हे समजताच त्यांनी मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली. पण काहीच कारवाई करण्यात आली नाही.