देश-विदेश
महाराष्ट्र सरकार ॲक्शन ‘ मोड’ मध्ये! कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बससेवा अनिश्चित काळासाठी बंद !
मुख्य संपादक

महाराष्ट्र सरकार ॲक्शन ‘ मोड’ मध्ये! कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बससेवा अनिश्चित काळासाठी बंद !
दिनांक 23/2/2025.
कर्णाटक,
कर्नाटकात महाराष्ट्र सरकारच्या एसटी बसवर हल्ला करण्यात आला. कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसचालकाच्या तोंडाला काळं फासलं आणि चालकाला मारहाणही केली. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड भाषा बोलता येते का? अशी विचारणा करत हा प्रकार घडवून आणला. या हल्ल्यानंतर, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार, कोल्हापुरातून कर्नाटकला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बससेवा थांबविण्यात आल्याचा मोठा निर्णय झाला. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.